नागपूरमध्ये संचारबंदी लागू – जाणून घ्या काय घडलं?

नागपूरम : नागपूरमध्ये दोन गटांमध्ये उसळलेल्या तणावानंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोणत्या भागांमध्ये संचारबंदी लागू आहे? काय आहे संपूर्ण प्रकरण?
नागपूरमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे! दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर पोलिसांनी तात्काळ संचारबंदी लागू केली आहे. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६३ (१) (२) (३) अंतर्गत हा कठोर निर्णय घेतला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण,
१७ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता शिवाजी महाराज पुतळ्यासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. 'औरंगजेब की कबर हटाव' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी प्रतिकात्मक कबर जाळल्यामुळे तणाव वाढला. यानंतर संध्याकाळी भालदारपुरा परिसरात दुसऱ्या गटाने दगडफेक केली. अचानक उसळलेल्या हिंसाचारात अनेक वाहनांचे नुकसान झाले.
पोलीसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वेळीच हस्तक्षेप केला. मात्र, वाढत्या तणावामुळे नागपूरच्या गणेशपेठ, कोतवाली, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
“पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, वैद्यकीय कारणे व अत्यावश्यक सेवांसाठी संचारबंदीमधून सूट देण्यात आली आहे. परंतु पाचपेक्षा अधिक लोकांचा जमाव, अफवा पसरवणे किंवा हिंसक कृती करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल.”
नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करणे ही सर्व नागपूरकरांची जबाबदारी आहे.
अफवांपासून दूर राहा आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करा. अधिक माहितीसाठी आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू.