Crime NewsLatest NewsNagpur
नागपूर हिंसाचार प्रकरणावर उपमुख्यमंत्र्यांचा संताप; दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

नागपूर :- नागपूर हिंसाचार प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून, पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. 33 ते 40 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचेही शिंदेंनी विधानसभेत सांगितले. तसेच औरंगजेब समर्थकांच्या समर्थनार्थ होणारे दंगे निंदनीय असल्याचेही त्यांनी म्हटले. विरोधकांच्या वक्तव्यावरही शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट :
नागपूर हिंसाचार प्रकरणावर आता राज्यभर प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून, राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. पुढील घडामोडींसाठी सिटी न्यूज बघत राहा city news.