शेजाऱ्यावर सूड उगवण्यासाठी निर्दोषाची हत्या

अमरावती, वलगाव :- शेजाऱ्यावर सूड उगवण्यासाठी निर्दोषाचा बळी! वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या या थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हत्या करून मृतकाच्या खिशात चिठ्ठी ठेवत, संशय दुसऱ्याच्या अंगावर टाकण्याचा डाव आखण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या तपासाने सत्य उघडकीस आलं.
पाहुयात ही संपूर्ण कहाणी :
वलगावमधील शिराळा परिसरात एका निर्दोष व्यक्तीची निघृण हत्या करण्यात आली. धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून हत्या केल्यानंतर आरोपीने मृतकाच्या खिशात खोट्या आरोपांची चिठ्ठी ठेवली. त्यामागचा उद्देश स्पष्ट होता – शेजाऱ्यावर खोटा संशय आणायचा! मात्र पोलिसांनी हुशारीने केलेल्या तपासानंतर सत्य समोर आलं आणि मुख्य मारेकऱ्याला अटक करण्यात आली. या धक्कादायक घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
एक निर्दोष जीव सुडाच्या भावनेला बळी पडला. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केलं आहे. पुढील तपास वलगाव पोलिस करत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी समाजात बंधुभाव आणि शांतता राखण्याचा संदेश यानिमित्तानं दिला जातोय. पाहत राहा सिटी न्यूज.