सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्र वैभवशाली राज्य – दिपक कुलकर्णी
अमरावती :- विद्याथ्र्यांनी भारतातील वैविध्यपूर्ण कलापरंपरेचा अभ्यास करावा, त्यातून शिकावं, आस्वाद घ्यावा. महाराष्ट्र सांस्कृतिकदृष्ट्या वैभवशाली राज्य आहे, असे मार्मिक विचार भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरचे सहायक संचालक श्री दिपक कुलकर्णी यांनी व्यक्त केले. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील प्रादर्शिक कला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 18 ते 20 मार्च दरम्यान आयोजित ‘लोकनाट¬ महोत्सव – 2025’ चे उद्घाटन करतांना ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी श्री एम.टी. देशमुख, पुणे येथील ज्येष्ठ रंगकर्मी व नाट¬ दिग्दर्शक श्री संजय कुळकर्णी, प्रादर्शिक कला विभागाचे समन्वयक डॉ. भोजराज चौधरी उपस्थित होते. उद्घाटनानंतर लगेचच कोंकणातील सिंधूदुर्ग जिल्ह्रातील कुडाळ येथील लोकनाट¬ दशावतार हे बाळकृष्ण गोरे व त्यांच्या चमूंनी सादर केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी अमरावतीचे ज्येष्ठ रंगकर्मी श्री एम.टी. देशमुख म्हणाले, दशावतार लोकनाट¬ाच्या कलाकारांनी आजही आपली लोककलेची परंपरा जोपासली आहे. दशावतार साकारणारे बाळकृष्ण गोरे यांनी बाल गंधर्व यांच्यासारखी प्रतिमा उभी केली, असे उद्गार श्री एम.टी. देशमुख यांनी काढले. श्री संजय कुळकर्णी म्हणाले, माणसं माणसांसाठी काहीतरी देत असतात, त्यामुळे कला जपल्या जातात. आपल्या लोककला, लोकसंस्कृती आजही जिवंत आहे. विद्याथ्र्यांनी लोककला आत्मसात कराव्या, या महोत्सवात सादर होणा-या लोककलांच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महोत्सवाच्या माध्यमातून देशातील लोककला विद्याथ्र्यांपर्यंत पोहचतील – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते
अध्यक्षीय भाषण करतांना कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, महाराष्ट्राला लोककलेची परंपरा लाभली आहे. अशा प्रकारच्या महोत्सवाच्या माध्यमातून देशातील लोककला विद्याथ्र्यांपर्यंत निश्चितच पोहचतील. तीन दिवस सादर होणा-या लोककलेचा विद्याथ्र्यांनी आस्वाद घ्यावा. दशावतार या लोकनाट¬ातील कलाकारांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी आपली ऐतिहासिक परंपरा आजही जोपासून ठेवल्याचे जाणवले. वंशपरंपरेपासून चालत आलेली दशावतार या लोकनाट¬ाची परंपरा त्यांनी आजही समर्थपणे उभी केली याचा अभिमान वाटतो, असेही कुलगुरू म्हणाले.
याप्रसंगी श्री दिपक कुलकर्णी यांनी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, दशावतारचे कलाकार बाळकृष्ण गोरे, श्री एम.टी. देशमुख, श्री संजय कुळकर्णी तसेच डॉ. भोजराज चौधरी यांचा शाल व मानचिन्ह देऊन सत्कार केला. संत गाडगे बाबा, नटराज प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून प्रादर्शिक कला विभागाचे समन्वयक डॉ. भोजराज चौधरी यांनी लोकनाट¬ महोत्सव आयोजनामागील भूमिका सांगितली. सूत्रसंचालन कु. रेणुका बोधनकर, तर आभार श्री अमोल पाणबुडे यांनी मानले. उद्घाटन कार्यक्रमाला अमरावती शहरातील विविध क्षेत्रातील गणमान्य नागरिक, विद्यार्थी तसेच प्रादर्शिक कला विभागातील विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.