32 वर्षानंतर परतवाड्यात पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात वेदी प्रतिष्ठा महोत्सव उत्साहात संपन्न

परतवाडा :- 32 वर्षांनंतर परतवाडा येथे पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात भव्य वेदी प्रतिष्ठा महोत्सव साजरा करण्यात आला. धार्मिक विधी, पटयात्रा, महाआरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह हा सोहळा उत्साहात पार पडला.
पाहूया या भक्तिमय सोहळ्याचा हा विशेष रिपोर्ट :
परतवाडा येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात वेदी प्रतिष्ठा महोत्सवानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 19 जोडप्यांनी इंद्रायणी इंद्र म्हणून अभिषेक पूजन केले. तसेच, त्यागी निवास स्थानाचा शिलान्यास विधीपूर्वक करण्यात आला.
परमपूज्य आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराज यांच्या आशीर्वादाने पूज्य संजयजी सरस चिंचोली यांच्या सानिध्यात जलमंडळ पूजा, पटयात्रा, आणि ध्वजारोहणासह महाआरती पार पडली.
या सोहळ्यासाठी जैन समाजाचे प्रतिष्ठित मान्यवर, महिला, पुरुष, आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात संपूर्ण शहर धार्मिक उत्सवाने न्हाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
परतवाड्यातील हा वेदी प्रतिष्ठा महोत्सव जैन समाजासाठी ऐतिहासिक ठरला. धार्मिक विधींपासून ते सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत संपूर्ण सोहळा भक्तिरसात रंगला. अशाच विविध बातम्यांसाठी पाहत रहा City News.