Crime NewsLatest NewsVidarbh Samachar
तेल्हारा शहरात सोशल मीडिया पोस्टवरून तणाव; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

अकोला :- अकोल्याच्या तेल्हारा शहरात सोशल मीडिया पोस्टमुळे तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी यावर तात्काळ नियंत्रण ठेवले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर शहरात एक मोठा वाद उभा राहिला.
तणावाच्या या घटनेनंतर पोलिसांनी एक तासाच्या आत हस्तक्षेप करत संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. आंबेडकर समर्थकांनी त्या तरुणावर आक्रमण केले आणि त्याला धिंड काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्वरित धाव घेतली, शहरात तणाव टाळण्यासाठी मुख्य चौकात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
शहरात सध्या शांतता आहे, पण पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास सुरू असून, परिस्थितीवर निगराणी ठेवली जात आहे. अधिक माहिती मिळाल्यास आम्ही आपल्याला लवकरच अपडेट करू.