LIVE STREAM

AmravatiLatest News

महानगरपालिकेकडून मालमत्ता करात 50% सूट : नागरिकांनी शेवटच्या संधीचा लाभ घ्यावा

अमरावती :- चालू वर्षी म्हणजेच सन 2024 – 2025 या आर्थिक वर्षात अमरावती महानगरपालिकेकडून मालमत्ता कराच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. जे मालमत्ताधारक चालू वर्षाचा 20 मार्च,2025 पर्यंत मालमत्ता कराचा भरणा करतील त्यांना सामान्य करात 50% सूट लागू राहील असे महानगरपालिकेकडून जाहीर प्रगटना द्वारे नागरिकांना कळविण्यात आले असून जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी या शेवटच्या संधीचा लाभ घ्यावा म्हणून आवाहन करण्यात आले आहे.

कर संकलन व कर आकारणी विभाग अमरावती शहर महानगरपालिका यांच्या वतीने विविध सुट योजना देऊनही काही थकबाकीदार टॅक्स भरणा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यांच्यावर मनपा मार्फत धडक जप्ती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार मनपा क्षेत्रात मालमत्ता कराच्या वसूलीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या वसूली पथकामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.

तरी व्याज, शास्ती माफी योजनेचा लाभ घेऊन आपल्याकडे देय असलेल्या कराचा भरणा करावा व जप्तीसारखी कटू कार्यवाही टाळावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!