अकोल्यातील तलाठी सुनील कल्ले चिमणी वाचविण्याचा ध्यास घेत आहेत

अकोला :- आजच्या विशेष रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत अकोल्यातील तलाठी सुनील कल्ले यांच्या अनोख्या प्रयत्नांबद्दल, ज्यांनी चिमणी वाचविण्यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून अथक मेहनत घेतली आहे. त्यांच्या घरात चिमण्या आणि विविध पक्षांचे वास्तव्य सुरु असून, ते पक्ष्यांसाठी एक सुरक्षित आसरा बनले आहेत
अकोल्यातील तलाठी सुनील कल्ले आणि त्यांच्या पत्नी सुनीता कल्ले यांनी अनेक वर्षांपासून पक्षांच्या संरक्षणासाठी आपल्या घरात धान्याच्या घरट्या उभारल्या आहेत. शेतातील धान्य हरवेस्टरच्या वापरामुळे आता पक्षांना अन्नासाठी भटकावं लागतं. यामुळे कल्ले यांनी घराच्या आवारात पक्षांसाठी चाऱ्याची आणि पाण्याची बारमाही व्यवस्था केली आहे. यामुळे त्यांच्या घरात चिवचिवाट ऐकायला मिळतो आणि अनेक दुर्मिळ पक्षांची ये-जा देखील होत आहे.
सुनील कल्ले आणि त्यांची पत्नी सुनीता कल्ले यांच्या या असामान्य प्रयत्नामुळे चिमण्यांसाठी एक सुरक्षित ठिकाण निर्माण झाले आहे. त्यांच्या कुटुंबाचा भगीरथ प्रयत्न आणि प्राणीप्रेम निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. याप्रकारे या महत्त्वाच्या कार्यात सहभागी होऊन अकोल्यातील कल्ले कुटुंब नेहमीच एक आदर्श ठरले आहे. हेच होते आजचं विशेष रिपोर्ट, आम्ही आपल्याला आगामी अपडेट्स देत राहू.