अमरावतीहून मुंबईत येऊन राष्ट्रवादी काँग्रेस युवा मोर्चाने आमदार संजय खोड़के यांचे केले स्वागत

मुंबई :- महाराष्ट्र विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य संजय खोड़के यांच्या आमदारपदाच्या निवडीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) युवा मोर्चाने मुंबईत जाऊन त्यांचे भव्य स्वागत केले. अमरावतीहून विशेषतः आलेल्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी खोड़के यांना शुभेच्छा देऊन पक्षाप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. या प्रसंगी विशाल खोड़के, मनोज केवले, निलेश शर्मा, मुकेश मालवीय, ललित मुदलियार, पंकज पढोले, कुणाल ठाकूर, संजय यादव, अमित तुपतकर, अमोल देशमुख, आशीष सगणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी संजय खोड़के यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष अधिक बळकट करण्याचा संकल्प केला. याच वेळी, उपस्थित कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या आमदार सौ. सुलभा संजय खोड़के यांचाही सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांनी या आत्मीय स्वागताबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि पक्षाच्या पुढील रणनीतीवर चर्चा केली.