अमरावती महानगरपालिकेतर्फे आयोजित कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न
अमरावती :- दिनांक 15 व 16 मार्च रोजी अमरावती महानगरपालिकेतर्फे आयोजित कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण नुकतेच उत्साहात पार पडले. स्थानिक अभियंता भवन येथे आयोजित या बक्षीस वितरण कार्यक्रमाला अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख ,उपायुक्त नरेंद्र वानखडे, डॉ. मेघना वासनकर, योगेश पिठे, मुख्यलेखापरीक्षक शामसुंदर देव, मुख्यलेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, दीप्ती गायकवाड, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, कार्यशाळा उपअभियंता लक्ष्मण पावडे, लेखा विभाग अधीक्षक प्रवीण इंगोले, सामान्य प्रशासन विभाग अधीक्षक नंदू पवार, बाजार परवाना अधीक्षक उदय चव्हाण, अजय विंचुरकर, राजेश आगरकर, आनंद जोशी, शिक्षक अधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम, शाळा निरीक्षक योगेश पखाले, क्रीडा निरीक्षक प्रवीण ठाकरे, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी पंकज सपकाळ, ज्योती बनसोड प्रामुख्याने उपस्थित होते.
पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेटचे सामने भरवण्यात आले होते. यामध्ये एकूण ०९ संघांनी सहभाग नोंदविला होता तसेच व्हॉलीबॉल चे सामने हे अंबापेठ स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर आयोजित केले होते. त्यामध्ये एकूण ०५ संघांनी सहभाग नोंदविला होता.
कार्यक्रमा वेळी सर्व खेळ प्रकारातील विजेते, उपविजेते टीम तसेच दोन महिने आधी मोर्शी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय नगरपरिषद व महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचारी खेळाडूंचा व शिक्षकांचा यावेळी ट्रॉफी व मेडल देऊन सत्कार माननीय आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान अमरावती शहरातील सुकन्या भारती फुलमाळी हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून तसेच नुकतेच पार पडलेल्या WPL टूर्नामेंट मध्ये गुजरात जायंट्स या संघाकडून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मनपा आयुक्त यांच्या हस्ते तिचा मोमेंटो सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
दररोजच्या दैनंदिन कामकाजातून आपले स्वतःचे छंद जोपासता यावे व स्वतःला विरंगुळा मिळावा या उद्देशाने अशा प्रकारच्या स्पर्धा दरवर्षी नियमितपणे होणे अपेक्षित असून अशा स्पर्धा झाल्यास कर्मचाऱ्यांमध्ये एकजुटीची भावना वाढण्यास मदत होईल होते असे मत आपले आपले मनोगत दरम्यान आयुक्त सचिन कलंत्रे यांनी व्यक्त केले.
उद्देश – कर्मचा-यामध्ये एकबंध आपला, वातावरण किंवा काम करतांना नविन ऊर्जा मिळावी, सतत काम केल्यावर एक आनंदी वातावरण निर्मितीकरिता मा.आयुक्त सचिन कलंत्रे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. मोठ्या संख्येने भाग घेतला. भविष्यात मोठा कार्यक्रम नियमित घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. सुत्रसंचालन प्रणाली ठाकरे व प्रियंका हंबर्डे यांनी केले.
क्रिकेट स्पर्धा विजेते – झोन क्रमांक ०३
क्रिकेट स्पर्धा उपविजेते – लेखा व ऑडिट विभाग
क्रिकेट स्पर्धा महिला विजेते – मनपा शिक्षिका टीम
क्रिकेट स्पर्धा महिला उपविजेते – आरोग्य विभाग टीम
व्हॉलीबॉल विजेता – झोन क्रमांक ०४ बडनेरा
व्हॉलीबॉल उपविजेता – झोन क्रमांक ०३
व्हॉलीबॉल महिला विजेता – झोन क्रमांक ०१ शिक्षिका
व्हॉलीबॉल महिला उपविजेता – झोन क्रमांक ०३ शिक्षिका
मॅन ऑफ द सिरीज – शिवम ढेंढवाल
मॅन ऑफ द मॅच – सूरज जाधव
या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री.प्रल्हाद कोतवाल, डॉ. प्रकाश मेश्राम, योगेश पखाले, प्रवीण ठाकरे, अमित झरकर, पंकज सपकाळ, कैलास कुलट, अश्विन पवार, प्रतीक बोरकर, मोदी मॅडम आदींनी प्रयत्न केले.