LIVE STREAM

AmravatiEducation NewsLatest News

भारतीय महाविद्यालय अमरावती येथे पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती संलग्नित भारतीय महाविद्यालय,अमरावती येथे सातवा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ बुधवार दि. १९ मार्च २०२४ रोजी अत्यंत थाटामाटात साजरा झाला. सातव्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष डॉ.सतीश कुळकर्णी,अध्यक्ष, भारतीय विद्या मंदिर, अमरावती, प्रमुख अतिथी डॉ. अविनाश असनारे कुलसचिव,संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, डॉ आराधना वैद्य, प्राचार्य, भारतीय महाविद्यालय, अमरावती,भारतीय विद्या मंदिराचे सचिव यदुराजजी मेटकर ,महाविद्यालयाच्या विविध शाखांचे समन्वयक, डॉ.दीपलक्ष्मी कुलकर्णी, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख, विज्ञान शाखा समन्वयक, प्रा.संगीता कुलकर्णी, मानव विद्या शाखा समन्वयक,डॉ संग्राम रघुवंशी,वाणिज्य विभाग प्रमुख, वाणिज्य शाखा समन्वयक विचारपीठावर उपस्थित होते.

सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील मानव विद्या शाखा, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा,विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. आराधना वैद्य यांनी आपल्या प्रास्ताविक व स्वागतपर भाषणात विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे हे सुरक्षित घरटे सोडून संघर्ष आणि स्पर्धेच्या युगात प्रवेश करत असताना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व सातत्य व जागरूकता कायम ठेवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.

या समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष डॉ. सतीश कुळकर्णी, अध्यक्ष, भारतीय विद्या मंदिर, अमरावती यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करत आजच्या युगाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार असले पाहिजे त्यासाठी वेळेच्या व्यवस्थापनाचे महत्त्व प्रतिपादन करत त्यांनी विद्यार्थ्यांना यशस्वीतेचा मंत्र प्रदान केला.

याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. अविनाश असनारे, कुलसचिव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी डॉ.अविनाश असनारे यांनी यशाची सप्तपदी मार्मिकपणे उलगडून दाखवली . या सप्तपदीची सात सूत्रे आत्मविश्वास, ध्येयनिश्चिती, प्रयत्न, जिद्द, सातत्य, चिकाटी व सामाजिक भान यांचे अनुसरण करून यशस्वी व्हावे असा मोलाचा संदेश दिला.
मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय श्रीधरराव चिंचमलातपुरे स्मृती पारितोषिक भूगोल या परीक्षेत महाविद्यालयातून प्रथम स्थान प्राप्त करणाऱ्या रश्मी सुधाकरराव इखार व साक्षी विजयराव इखार या विद्यार्थिनींना प्रदान करण्यात आले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथील इंग्रजी कला पारंगत विषयातील गुणवत्ता यादीतील प्रथम विद्यार्थी विशाल विनोद राठी याला पुरस्कार व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच प्रा. बी.जी.कडू यांच्या स्मृती प्रित्यर्थ वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत पदवी स्नातक स्तरावर सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह प्रियंका वैष्णव व वाणिज्य पारंगत या विषयात कोमल दुबे या विद्यार्थिनींना प्रदान करण्यात आले. तसेच विज्ञान विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थाला स्वर्गीय उमरलालजी केडिया स्मृती प्रित्यर्थ रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह तेजस दुर्योधन बोधनकर या विद्यार्थ्यास प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. मीता कांबळे यांनी केले.

समारंभाच्या यशस्वीतेसाठी आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. विजय भांगे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रशांत विघे, भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. विनोद कल्यामवार व प्राध्यापक वर्गाने विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.अंबरीश काळीकर, डॉ. दया पांडे,डॉ. सुमेध आहाटे, डॉ. मंगल भाटे,डॉ. संगीता देशमुख, डॉ. भार्गवी चिंचमलातपुरे, डॉ. मीना डोईबोले, डॉ विक्रांत वानखडे ,डॉ.पल्लवी सिंग ,डॉ. आम्रपाली वासनीक, डॉ. स्नेहा जोशी, डॉ. वैशाली बिजवे, डॉ. गायत्री चवाळे, प्रा. पंडित काळे, डॉ. भारती भडके,डॉ. सोनाली उपलेंचवार ,डॉ. रावसाहेब यादगिरे , प्रा.वृषभ पाटील,ऋषभ डहाके प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमास महविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!