शाळकरी विद्यार्थ्यांचा गंभीर अपघात: झळपीपुरा रस्त्याची दुरावस्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष

अमरावती :- आज आपल्या समोर एक गंभीर घटना आहे, जी घडली आहे मसानगंज परिसरातील झळपीपुरा भागात. शाळकरी विद्यार्थ्यांचा सायकलवरून पडून झालेला अपघात, ज्याचे कारण रस्त्याच्या दुरावस्थेने निर्माण केलेली मोठी समस्या आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याच्या दुरावस्थेमुळे स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि आता शाळकरी मुलं देखील त्रस्त झाले आहेत.
झळपीपुरा परिसरात रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आज दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. सायकल चालवताना त्यांनी मोठ्या दगडांवर पडल्यामुळे ते रक्तबंबाळ झाले. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांचे काम प्रलंबित आहे, तसेच नाली पाणी आणि स्ट्रीट लाईटच्या समस्या सुद्धा कायम आहेत.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार केला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. आज नागरिकांनी आपल्या संतापाचे वातावरण व्यक्त करत प्रशासनाकडून त्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांच्या अपघातामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनुसार लवकरात लवकर या समस्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे. सिटी न्यूजवर आपल्याला याबाबतची अधिक माहिती मिळवता येईल.