सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये 50 व्या किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया; पत्नीने पतीला दिले जीवनदान

अमरावती :- सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल च्या 50 वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेने एक नविन उदाहरण निर्माण केले आहे, ज्यात एक पत्नीने आपल्या पतीला जीवनदान देण्यासाठी त्याला आपली किडनी दान केली आहे. बाळापूर येथील 58 वर्षीय शेख मेहबूब शेख अहमद यांना किडनी आजाराने त्रस्त असताना त्यांच्या पत्नी नजमा बी शेख यांनी आपल्या एक किडनी त्यांना दान केली. 9 महिन्यांपासून रुग्ण किडनीच्या आजाराने ग्रस्त होते, परंतु पत्नीच्या दानाने त्यांना जीवनदान मिळाले. या शस्त्रक्रियेच्या यशस्वितेत हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्स, आणि तज्ञांचा अत्यंत महत्त्वाचा हात आहे. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य केली गेली.
आता 50 किडनी प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रियांचा टप्पा पार झाला असून, रुग्णांनी आपल्या कुटुंबीयांच्या माध्यमातून एक दुसऱ्याला जीवनदान दिले आहे. हे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या यशस्वी कार्याचे प्रतिक आहे. ही शस्त्रक्रिया रुग्णांसाठी एक नवा आशेचा किरण ठरली आहे.