३२ वर्षीय महिला नोकरीसाठी राजधानीत आली, ऑटो चालकाने बलात्कार केला, त्यानंतर तिचा जीव घेतला

उत्तर प्रदेश :- उत्तर प्रदेशमध्ये महिला सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ३२ वर्षीय महिलेवर रिक्षा चालकाने बलात्कार केला, त्यानंतर तिचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना लखनौमध्ये घडली आहे. धक्कादायक म्हणजे, महिला नोकरीच्या शोधासाठी बनारसमधून लखनौला आली होती. रिक्षा चालकाने तिच्यावर बलात्कार करून खून केला. त्या महिलेचा मृतदेह आंब्याच्या बागेत मिळाला.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या मृतदेहावर कपडे फाटलेले होते. अंगावरील सोनं, बॅग काहीच नव्हते. बलात्कार केल्यानंतर पैसे लुटल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. बलात्काराची घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांचा संताप पाहाता पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.
ऑटो चालकावर हत्या, बलात्काराचा संशय :
मिळालेल्या माहितीनुसार, महिला वाराणसीवरून लखनौला नोकरीसाठी आली होती. आलमबाग बस स्थानकावरून ऑटोमधून बसून निघाली होती. ऑटोमध्ये असताना ती आपल्या भावासोबत फोनवर बोलत होती. त्यानंतर फोन कट झाला, खूप वेळानंतरही घरी न पोहचल्यामुळे कुटुंबियांनी पोलिसांत संपर्क साधला. पोलिसांनी फोन स्ट्रेस केल्यानंतर लोकेशन मिळाले, तिथे तिचा मृतदेह होता.
बलात्कार केल्यानंतर हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासात आहे. आरोपी ऑटो चालकच असल्याचा पोलिसंना संशय आहे. सुरूवातीच्या तपासात हे प्रकरण हत्या आणि लुटीचं असल्याचे दिसते. महिलेच्या हत्येची बातमी समजताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. मुलीच्या कुटुंबियांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.