इंनलेव्ह अपार्टमेंटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह: आत्महत्या की काही अन्य कारण ?

नागपूर :- नागपूर शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे इंनलेव्ह अपार्टमेंटमध्ये एक 38 वर्षीय इसमाचा कुजलेला मृतदेह सापडला आहे. काय कारण आहे या मृत्यूचं? तपास करत असलेल्या पोलिसांच्या मते, आत्महत्या होण्याची शक्यता आहे.
जाणून घेऊया सविस्तार माहिती :
नागपूर शहरातील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंनलेव्ह अपार्टमेंटमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. इथे 38 वर्षीय इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. स्थानिक रहिवासींनी दुर्गंधीच्या सूचनेवरून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून मृतदेह पाहिला आणि त्यानंतर तपास सुरू केला. मृतकाची पत्नीने पोलिसांना सांगितले की, तिचा पती दारूच्या व्यसनामुळे त्रस्त होता, त्यामुळे ती माहेरी गेली होती. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवला आणि आत्महत्या झाल्याचा संशय व्यक्त केला.
या घटनाबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. आत्महत्या किंवा अन्य कारण, याबाबत पूर्ण तपास होईल.