किरकोळ वादातून माजी उपसरपंच तरुणाचा छातीत धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून

जळगाव :- आज सकाळी जळगाव जिल्ह्यातील भादली गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून एका माजी उपसरपंच तरुणाचा छातीत धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. अधिक तपासासाठी नशिराबाद पोलिस स्टेशनला घटनाची नोंद सुरू आहे.
जळगाव जिल्ह्यातील भादली गावात ३६ वर्षीय युवराज सोपान या माजी उपसरपंचाचा निर्घृण कोळीचा खून करण्यात आला. गुरुवारी रात्री झालेल्या वादाच्या तावात अज्ञात तीन व्यक्तींनी चाकू आणि चॉपरने त्याच्या छातीत वार केले. ही घटना आज सकाळी ८ वाजता घडली. शेतकऱ्यांच्या समोर झालेल्या या घटनेने गावात खळबळ उडाली असून मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, युवराज कोळी यांचा काल रात्री काही लोकांशी वाद झाला होता. या वादातून अज्ञात तीन जणांनी त्यांच्यावर चाकू आणि चॉपरने हल्ला केला. युवराज यांच्या छातीत धारदार शस्त्राने वार करण्यात आले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना काही शेतकऱ्यांसमोर घडली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत मारेकरी पसार झाले होते. युवराज यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
युवराज कोळी यांच्या मृत्यूमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली होती. युवराज हे शिंदे गटाचे माजी उपसरपंच होते, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तपास सुरू केला असून या प्रकरणी अधिक माहिती मिळवण्याचे काम चालू आहे. या धक्कादायक घटनेमुळे भादली गावात तणावाची स्थिती आहे. पुढील तपासासाठी पोलिसांकडून अधिक माहिती मिळवली जाईल. आपल्याला पुढील अपडेट्स देत राहू.