AmravatiLatest News
घरकुल इंडस्ट्रीजकडून अमरावती विद्यापीठाला 3 लक्ष रुपयांचा सीएसआर निधी प्राप्त

अमरावती :- अमरावती शहरातील प्रसिध्द घरकुल इंडस्ट्री प्रा. लि. कडून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला तीन लक्ष रुपयांचा सी.एस.आर. निधी प्राप्त झाला आहे. घरकुल उद्योगाचे श्री. तुषार वरणगावकर श्री तुषार वरणगांवकर यांनी तीन लक्ष रुपयांचा धनादेश कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांना सुपूर्द केला.
घरकुल उद्योगाचे श्री. तुषार वरणगावकर यांच्याशी सीएसआर समितीचे सदस्य सचिव तथा विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.अजय लाड यांनी विद्यापीठातील शैक्षणिक कार्य, विद्यार्थहितार्थ संपर्क साधला होता. याप्रसंगी त्यांनी श्री तुषार वरणगांवकर यांचे आभार व्यक्त केले. यावेळी विद्यापीठाचे डॉ. अजय लाड, वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे उपस्थित होते.