राहुल नगर प्रभागातील स्वच्छतेची अवस्था गंभीर, कचऱ्याचे ढिगारे पसरले दुर्गंधीचे साम्राज्य

अमरावती :- आज आपण पाहणार आहोत राहुल नगर प्रभागातील स्वच्छतेची भयावह अवस्था. विविध परिसरांतील कचऱ्याचे ढिगारे आणि नालीतील जड कचरा सध्या समस्येचे कारण ठरले आहेत. याबद्दल स्थानिक महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
राहुल नगर प्रभागातील अनेक परिसरातील नाले कचऱ्याने तुडुंब भरले आहेत. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, काही दिवसांपूर्वी नाल्यांमधून कचरा बाहेर काढला गेला, पण तो उचलून नेण्यास स्वच्छता कर्मचाऱ्यांना विसर पडला. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे, ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
महिलांनी या कचऱ्याच्या ढिगार्यामुळे होणाऱ्या अस्वच्छतेवर संताप व्यक्त केला असून, यावर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
राहुल नगर प्रभागातील स्वच्छतेची गंभीर अवस्था प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कायम आहे. स्थानिक नागरिकांची सुरक्षा आणि आरोग्य ही गंभीर चिंता आहे. सिटी न्यूजला यावर प्रशासनाकडून त्वरित उत्तर मिळावे अशी आशा आहे. धन्यवाद.