विद्यापीठाच्या सत्र 2024-25 च्या नियमित व माजी विद्याथ्र्यांना उन्हाळी परीक्षेकरिता आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याचे आवाहन

अमरावती :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र 2024-25 च्या सर्व अभ्यासक्रमाच्या नियमित व माजी विद्याथ्र्यांना उन्हाळी – 2025 करिता (यू.जी. एन.ई.पी. अभ्यासक्रमाच्या सत्र 1 व सत्र 2, बी. फार्म अभ्यासक्रमाच्या सत्र 1 व सत्र 2 आणि एम. फार्म अभ्यासक्रमाच्या सत्र 1 च्या परीक्षा वगळून) सर्व अभ्यासक्रम परीक्षांचे आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने 31 मार्च, 2025 पर्यंत सादर करावयाचे आहेत.
विद्याथ्र्यांनी आपले ऑनलाईन परीक्षा आवेदनपत्र त्यांना महाविद्यालयाने वितरित केलेल्या लॉगीन आय.डी. आणि पासवर्डव्दारेच https://sgbau.ucanapply.com या संकेतस्थळावर जावून स्टुडंट या टॅबवर क्लिक करुन भरण्यात यावे. आवेदनपत्राची पिं्रट काढून महाविद्यालयात जमा न केल्यास विद्याथ्र्यांना परीक्षा क्रमांक प्राप्त होणार नाही. तसेच परीक्षेचे विहित केलेले परीक्षा शुल्क पेमेंट गेटवे व्दारे ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र सादर करतेवेळीच विद्यापीठ खात्यात जमा करण्यात यावे. ज्या विद्याथ्र्यांना परीक्षा शुल्क ऑनलाईन भरणे शक्य नसेल, किंवा ज्या विद्याथ्र्यांचे परीक्षा आवेदनपत्रे महाविद्यालये सादर करीत असतील, अशा विद्याथ्र्यांचे विहित परीक्षा शुल्क एकत्रितरित्या महाविद्यालयांनी त्यांच्या लॉगीन मधून ऑनलाईन पेमेंट या टॅब मधून भरण्यात यावेत. त्यासाठी महाविद्यालयांना विद्यापीठात येण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर विद्याथ्र्यांनी सादर केलेले ऑनलाईन परीक्षा आवेदनपत्र महाविद्यालयाने व्हेरिफाईड करणे अनिवार्य आहे. महाविद्यालयाने विद्याथ्र्यांची व्हेरिफाईड यादी रिपोर्ट सेक्शन मधून काढावी. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर व्हेरिफिकेशन यादी विहित केलेल्या तारखेच्या आंत विद्यापीठात सादर करावी. तसेच महाविद्यालयाने विद्याथ्र्यांच्या परीक्षा आवेदनपत्राची पिं्रट आऊट महाविद्यालयातच जतन करावी.
दिव्यांग विद्याथ्र्यांची माहिती (दिव्यांग प्रमाणपत्र व इतर आवश्यक दस्तावेजांसह) महाविद्यालयाने स्वतंत्रपणे विद्यापीठामध्ये सादर करावी व त्यानंतरच विद्यापीठाव्दारे पुढील कार्यवाही करण्यात येईल. विद्याथ्र्यांचा लॉगीन आय.डी. आणि पासवर्ड हा विद्याथ्र्यांच्या मुळ महाविद्यालयातूनच उपलब्ध होईल. जर एखाद्या नियमित विद्याथ्र्यांचे मागील परीक्षेकरिता नियमितसाठी परीक्षा आवेदनपत्र भरलेले नसेल अशा विद्याथ्र्याने उन्हाळी 2025 परीक्षेकरिता नियमितच्या ऐवजी माजी म्हणून ऑनलाईन परीक्षा आवेदनपत्र भरावे व महाविद्यालयाने अशा विद्याथ्र्यांचे अंतर्गत सत्र गुण सविस्तरपणे पत्राव्दारे विद्यापीठात सादर करावे. ज्या विद्याथ्र्यांनी गॅप घेऊन नियमित सत्राला प्रवेश घेतला असेल अशा विद्याथ्र्यांनी गॅप आणि पॅनल मधून ऑनलाईन परीक्षा आवेदनपत्र भरावे. महाविद्यालये, विद्याथ्र्यांनी परीक्षा शुल्क परीक्षा आवेदनपत्र भरल्यानंतर पेमेंट गेटवे व्दारे भरावे. ज्या परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर व्हावयाचे आहेत, अशा परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सदर परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्यांना सदर परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दहा दिवसापर्यंत ऑनलाईन परीक्षा आवेदनपत्र सादर करता येईल, असे परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून कळविण्यात आले आहे.
यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, मानद संचालक, विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, मॉडेल डिग्री कॉलेज, बुलडाणा यांना कळविण्यात आले असून विद्याथ्र्यांनी सुध्दा याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता त्यांचेशी 9850042357 या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.