कान्हेरी सरप गावाची जलसंपत्ती वाचवण्याची प्रेरणादायक कथा!

अकोला :- जागतिक जल दिवस हा दरवर्षी २२ मार्च रोजी साजरा केला जातोय…या दिवसाचे आयोजन जागतिक स्तरावर जलसंपत्तीच्या संरक्षणाची जागरूकता निर्माण करण्यासाठी केले जाते. या जनजागृतीचा उत्तम उदाहरण म्हणजे अकोला जिल्ह्यातील कान्हेरी सरप हे गाव. कशा प्रकारे सकारात्मक पाऊल उचलल्याने या गावाची कायापालट झाली आहे पाहूया.
अकोला शहरा जवळ असलेल्या 15 हजार लोक वस्तीच कान्हेरी सरप हे गाव सध्या दुष्काळमुक्त झालं आहेय…गावकऱ्यांनी हे दुष्काळ दूर करण्यासाठी एकत्र येत गावातील नदीचं 6 किलोमीटर लांबी पर्यंत खोलीकरण श्रमदानातून केलं त्याचं बरोबर गावातील विहीर सफाई केली याचं फायदा आता गावकऱ्यांना झालाय..गावात शेततळे बांधले , विहीर स्वच्छता केली, यामुळे पाण्याची पाणीपातळी वाढली आणि आता. गावकऱ्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहेय.
सरकार आणि स्थानिक प्रशासन यांनी पाण्याच्या वापराबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यावर भर दिलाय याचाच परिणाम म्हणजे अनेक गावांचा पाणी प्रश्न नाहीसा झालाय तर काही गाव आजूनही दुष्काळात होरपळत आहेय..कान्हेरी सरप येथील या उपक्रमामुळे गावात पाण्याची उपलब्धता वाढली असून, पाण्याची गुणवत्ता देखील सुधारली आहेय..कान्हेरी सरप येथील गावकऱ्यांच्या एकजुटीने पाणी प्रश्नावर एक सकारात्मक बदल घडवून आणला आहेय.
कान्हेरी सरप गावातील नदी , विहीर डिसेंबर महिन्यातच कोरडी पाडायची मात्र पाणीच महत्व ओळखून गावकऱ्यांनी केलेल्या कामामुळे गावाचा दुष्काळ दूर झालाय..गावातील श्रीकृष्ण ठोंबरे सारखे अनेक शेतकरी पण्या अभावी खरीप हंगामात पीक घेण्यास असमर्थ होते मात्र आता पाण्याची पातळी वाढल्याने 12 ही महिने येथील शेतकरी , कांदा , गहू , मका , तूर , हरभरा सारखे पिके घेत असून त्यांचा जीवनमान सुद्धा उंचाविलाय.
ज्यामुळे पाण्याचा अपव्यय थांबवता येईल आणि पृथ्वीवरील जलसंपत्ती जपता येईल असे प्रयत्न आता काळाची गरज बनलीय..आपण सर्वांनी मिळून आता जलसंपत्तीच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे आता तितकेच आवश्यक आहेय.