धनश्री विजय कुंडलकरची अद्वितीय कामगिरी: सात तासांत ३० किलोमीटर समुद्र जलतरण करून यवतमाळचा डंका!

यवतमाळ :- खळखळत्या समुद्रात धनश्रीचा ३० किमीचा प्रवास जलतरण स्पर्धेत सात तासात अंतर पार, गुजरातमध्ये यवतमाळचा डंका कान्हेरी सरप गावाची जलसंपत्ती वाचवण्याची प्रेरणादायक कथा!
यवतमाळ येथील १४ वर्षीय धनश्री विजय कुंडलकरने गुजरात राज्यातील समुद्रातील १६ नॉटिकल मैलांचे म्हणजेच ३० किलोमीटर एवढे अंतर केवळ सात तासांत पार करून ‘यशश्री’ कामगिरी केली आहे. गुजरात सरकारच्या युवक कल्याण महोत्सवांतर्गत बुधवारी आयोजित लांब पल्ल्याच्या सागरी जलतरण स्पर्धेत तिने हे यश मिळवले. धनश्रीला किनाऱ्यापासून २०० मीटर सुरक्षित अंतर राखत समुद्राच्या खवळलेल्या प्रवाहात जलतरण करण्याचे आव्हान देण्यात आले होते. भारतीय नौदल विभागाच्या मानकानुसार, एक नॉटिकल मैल म्हणजे जमिनीवरील १.८५० किलोमीटर अंतर असते. यवतमाळच्या धनश्रीने मुलींसाठी निर्धारित असलेले १६ नॉटिकल मैलांचे अंतर जिद्दीने आणि धाडसाने पूर्ण केले.