राळेगाव शहरात भीषण आग, चार दुकाने जळून खाक; लाखोंचे नुकसान

यवतमाळ :- यवतमाळ जिलयातील राळेगाव शहरात मध्यरात्री भीषण आग लागली आहे, ज्यामुळे चार दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या आगीमुळे लाखोंचे नुकसान झाले असून आग नियंत्रणात येईपर्यंत चार तासांचा काळ गेला. आपल्याला पुढे सविस्तर माहिती घेऊन येतो.
राळेगाव शहरात मध्यरात्रीच्या दरम्यान, माता मंदिर समोरील मार्केटमध्ये आग लागली. अग्निकांडात चार दुकाने जळून खाक झाली आहेत. आग विझवण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला, परंतु तांत्रिक अडचणीमुळे नगरपंचायतची अग्निशामक यंत्रणा देखील घटनास्थळी वेळेवर पोहोचली नाही. आग आटोक्यात येताच चार तासांचा मोठा कालावधी गेला.
राळेगाव शहरात झालेल्या या भीषण अग्निकांडामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून या आगीच्या तपासाचे निर्देश दिले गेले आहेत, आणि त्याचबरोबर आगीची कारणे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशीच अधिक माहिती आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवू. धन्यवाद !