अजब! दारु पिऊन गाडीत बसला म्हणून पोलिसांनी प्रवाशाला ठोकला 1000 रुपयांचा दंड; पोस्ट व्हायरल

मद्यपान केलेल्या एका चालकाना पोलिसांनी 1000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे चालक गाडी चालवत नसतानाही पोलिसांनी त्याला दंड ठोठावला. चालकाने Reddit वर सगळा घटनाक्रम शेअर केला आहे. ‘गोरेगावमध्ये ड्रिकिंग अँड ड्रायव्हिंग, काल रात्री पोलिसांनी माझी कार अडवली’, असं चालकाने पोस्टमध्ये सांगितलं आहे.
चालकाने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, पार्टीमधून परतत असताना पोलिसांनी कार रोखली. आपण खूप संतापलो होतो हे मान्य करताना त्याने आपला वैयक्तिक ड्रायव्हर गाडी चालवत होता असं सांगितलं. ड्रायव्हरची अनेक वेळा तपासणी करण्यात आली आणि तो व्यवस्थित असल्याचं आढळलं. गाडीत दारू सापडली नाही आणि चालक गाडी चालवण्यास योग्य असूनही, पोलिसांनी त्याला फक्त प्रवासी म्हणून मद्यधुंद असल्याबद्दल 1000 रुपये दंड ठोठावला, असा दावा त्याने केला आहे.
“त्यांनी मला विचारले की मी मद्यपान केलं आहे का, जे स्पष्ट दिसत होतं आणि खरं होतं. मी एका पार्टीतून परतत असताना त्यांनी गाडीत दारु आहे का याची तपासणी केली. दारू पिऊन आल्याबद्दल त्यांनी मला 1 हजारांचा दंड ठोठावला,” असं त्याने लिहिलं आहे. पोस्टच्या शेवटी प्रवाशाने विनोदी पद्धतीने कबुली देत पोस्ट संपवली आहे. “जर ते अर्थपूर्ण नसेल तर माफ करा, मला आत्ताच डोकेदुखी होत आहे,” असं त्याने पोस्टच्या अखेरीस लिहिलं. काही वेळातच ही पोस्ट व्हायरल झाली.
या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत आपली मतं मांडली आहेत. “काय? ते तुला दंड कसा काय ठोठावू शकतात? मग लोकांनी बारमध्ये कसं जायचे?” यावर, त्याने उत्तर दिलं की, “मी गोंधळलो आहे, हे मॉरल पोलिसिंगसारखे दिसते. त्यांनी माझ्यावर दारू प्यायल्याचा आरोप केला.”
एका युजरने स्वतःचा अनुभव सांगताना म्हटलं की, “मी थोडंसं मद्यपान केलं होतं आणि गुडगावमध्ये मला थांबवण्यात आले. मी मद्यपान करत असल्याचे मान्य केले आणि माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. त्यांनी माझ्या नंबर प्लेट आणि फोन स्क्रीनचा फोटो काढला आणि मला जाऊ दिले. ऑनलाइन चलन मिळाले नाही. मागच्या सीटवर बसून मद्यपानाचे पैसे कोण देते? पोलिसांनी तुम्हाला फसवलं”.
मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 नुसार, दारू किंवा ड्रग्जच्या प्रभावाखाली वाहन चालवणे हा दंडनीय गुन्हा आहे. पहिल्या गुन्ह्यासाठी 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा 10 हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी, शिक्षा 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 10 हजार रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकते.