पत्नी आणि तीन मुलांची गोळ्या घालून हत्या

आयटी इंजिनियरने आपल्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली होती. अशीच घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. एका भाजप नेत्याने आपल्या तीन 3 लहान मुलांची गोळ्या झाडून हत्या केली. तसेच पत्नीला देखील गोळ्या घातल्या या घटनेत प्तनी गंभीर जखमी झाली आहे. या हत्या कांडामागे धक्कादायक कारण उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे पुण्यात आयटी इंजिनीयरने आपल्या मुलाची ज्या कारणावरुन हत्या केली त्याच कारणावरुन भाजप नेत्याने देखील आपल्या मुलांचा जीव घेतला आहे. भाजप नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
योगेश रोहिला असे आपल्या मुलांची हत्या करणाऱ्या भाजप नेत्याचे नाव आहे. योगेश रोहिला हे पत्नी आणि 3 मुलांसह उत्तरप्रदेशच्या सहारनपूरमध्ये राहत होते. योगेश रोहिला याने आपल्या तीन निष्पाप मुलांसह पत्नीवर गोळ्या झाडल्या. यात 11 वर्षांची मुलगी आणि 4 आणि 6 वर्षांच्या मुलांचा मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी आहे. पोलिसांनी आरोपी भाजप नेता योगेश रोहिला याला घटनास्थळावरून अटक केली आहे.
योगेश याचे पत्नीह जोरदार भांडण सुरु होते. रागाच्या भरात योगेश यांनी बंदुक काढली आणि पत्नीच्या डोक्याला लावली. आईला मारु नका अशी विनवणी मुलीने वडिल योगेश याला केली. मात्र, योगेशने पत्नीच्या डोक्यात गोळी घातली. आईला रुग्णालयात घेऊन चला असा म्हणत पुन्हा मुलीने वडिलांचे पाय धरले. मात्र योगेश ने आपल्या 11 वर्षाच्या मुलीला गोळ्या घातल्या. भितीने 4 आणि 6 वर्षांची दोन्ही मुली पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना योगेशने या दोन्ही मुलांना देखील देखील गोळ्या घातल्या. रोहिलानं पत्नी नेहावर गोळ्या झाडल्यावर 3 मुलांची डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली.
गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारी योगेशच्या घरी धावून आले. मात्र, रक्ताच्या थारोळ्यात पडलेली योगेश याची पत्नी तीन मुलांचे मृतदेह पाहून शेजारी हादरले. घटनेनंतर योगेशने स्वत: पोलिसांना फोन केला आणि मुलांची हत्या केल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत योगेश यावा अटक केली आहे.
हत्ये मागे धक्कादायक कारण उघड
योगेश पत्नीवर संशय घेत होता. यातूनच दोघांमध्ये वारंवार वाद होत होता. शेवटी हा वाद इतका विकोपाला गेला की योगेशने मुलांची हत्या करुन संसार उद्वस्त केला आहे. पुण्यातही आयटी इंजिनीयरने संशायाच्या भरात आपल्या तीन वर्षाच्या चिमुरड्याची हत्या केली.