मनपा अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी केली स्वच्छता अभियान अंतर्गत मध्य झोन कार्यालयाची पाहणी
अमरावती :- महानगरपालिका मध्य झोन क्रं.2 राजापेठ या कार्यालयातील कारभार अधिक पारदर्शक, गतीमान, लोकभिमुख करण्याकरीता राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागासाठी १०० दिवसासाठी कलमी कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. सबब कृती आराखड्यातील कार्यालयीन स्वच्छता करण्याबाबतचे मा. अतिरिक्त आयुक्त यांनी दि. १९/०३/२०२५ रोजीच्या १०० दिवसाच्या कृती आराखडा बाबत घेतलेल्या सभेत निर्देशित केले आहे. त्यांनी केलेल्या निर्देशित केल्यानुसार शनिवार दि. २२/०३/२०२५ रोजी मध्य झोन क्रं.२ राजापेठ येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मध्य झोन अंतर्गत मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विशेष स्वच्छता मोहीम राबवून कार्यालयाची स्वच्छता केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी मनपा मध्य झोन कार्यालयाची पाहणी केली.या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या नेतृत्वात स्वच्छता मोहीम राबवून मध्य झोनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत स्वच्छतेची शपथ घेऊन सदर मोहीमेची सांगता केली. स्वच्छ झालेल्या कार्यालयातील डांस अळी नाशक औषधीची फवारणी व धुवारणी केली. या विशेष स्वच्छता मोहिमेत अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, सहायक आयुक्त भुषण पुसतकर यांच्यासह मनपा कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. सदर कार्यालयात निघणारा ओला व सुका कचरा वेग-वेगळा गोळा करून मनपाच्या घंटा गाडीत कचरा टाकावा, शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकने बनलेल्या वस्तूंचा वापर व हाताळणी पूर्णपणे बंद करण्याचे आवाहन मनपा अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी केले आहे.