महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी दिली भव्य आरोग्य शिबिराला भेट
अमरावती :- आज दिनांक 22/03/2025 रोजी महानगरपालिका अंतर्गत शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशन अमरावती येथे राज्य शासनाच्या क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यक्रमासाठी शंभर दिवसाच्या कृती आराखड्याच्या अंतर्गत मा. आयुक्त मनपा अमरावती यांच्या मान्यतेने प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरामध्ये मनपाचे स्थायी /अस्थाई व कंत्राटी कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये CBC, LFT, KFT, THROID FUNCTION TEST, LIPID PROFILE, CALCIUM TEST, RA FACTOR, HBA1C, MALE CEA FEMALE CA125, BP, आणि SUGAR इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. त्याचबरोबर क्षयरोग तपासणी अंतर्गत एक्स-रे व थुंकी तपासणी करण्यात आली. सदर दिक्षा फाउंडेशन द्वारा संचालित फिरते नेत्र चिकित्सक यांनी आलेल्या कर्मचाऱ्यांचे डोळे तपासणी करून दिली. तेव्हा मोठ्या संख्येने मनपा कर्मचारी यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिराला महानगरपालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी भेट देऊन संपूर्ण शिबिराची पाहणी करून माहिती घेतली. या भेटी दरम्यान महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, मुख्यलेखापरीक्षक शामसुंदर देव, शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे, सहायक आयुक्त भूषण पुसतकर यांनी स्वतः आरोग्य तपासणी केली तसेच शिबीर यशस्वी करण्याकरिता वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. फिरोज खान, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाठबागे,स्त्री वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी खडसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र गुल्हाने व इतर सर्व कर्मचारी यांनी अथक परीश्रम घेऊन सदर आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी पणे पार पाडले.
रविवार दिनांक 23/03/2025 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 या वेळेत मनपा दवाखाना आयसोलेशन, दसरा मैदान जवळ, बडनेरा रोड, अमरावती येथे सर्व मनपा कर्मचारी स्थायी, अस्थायी, कंत्राटी व बाह्य संस्था यांचे प्राथमिक आरोग्य तपासणी बाबत भव्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व कर्मचाऱ्यांनी सदर आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका अमरावती यांनी केले आहे.