वाकी रायपूर ते पूर्णा नगर मार्गावर ट्रकला भीषण आग

अमरावती, वाकी रायपूर :- वाकी रायपूर ते पूर्णा नगर मार्गावर एका धक्कादायक घटनेत ट्रकला अचानक आग लागली. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेने समोर आलेल्या माहितीच्या आधारे, नागरिकांची तत्परता आणि ट्रक चालकाची सूचकता यामुळे मोठा अनर्थ टळला.
२३ मार्च रोजी दुपारी ३ वाजता वाकी रायपूर ते पूर्णा नगर मार्गावर कुटार घेऊन जाणाऱ्या ट्रकला शॉक सर्किट मुळे भीषण आग लागली. ट्रक चालक सेफिन खा आवेश खा रा खोलापूर याच्या सूचकतेमुळे ट्रक शेतात नेऊन उभा केला, त्यामुळे आग लागलेल्या ट्रकने वाकी रायपूर गावात प्रवेश केला नाही. नागरिकांनी तत्काळ आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
घटनेची माहिती मिळताच आसेगाव पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यात यश मिळवले. आगीमध्ये कुटार आणि सामग्रीसह अंदाजे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पुढील तपास आसेगाव पोलीस करीत आहेत
या दुर्घटनेतून शिकवण घेऊन, आपण सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत अधिक सजग राहायला हवे. आगीच्या या घटनेची अधिक माहिती आम्ही आपल्याला पुढील तपासानंतर देऊ. अधिक अपडेटसाठी आमच्या सोबत राहा.