विद्यापीठात एकदिवसीय करिअर मार्गदर्शन कार्यशाळा व गुणवंत विद्याथ्र्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न मानसशास्त्र विभाग, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय आणि मानस प्रबोधनी यांचा संयुक्त उपक्रम

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा मानसशास्त्र विभाग, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय आणि मानस प्रबोधनी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात एकदिवसीय करिअर मार्गदर्शन कार्यशाळा व गुणवंत विद्याथ्र्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला. प्रा. प्रमोद सांभारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. स्पर्धेच्या युगात युवकांमध्ये करिअर बाबत अनेक संभ्रम आहेत. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो. समस्यांचे निरासन व्हावे, या हेतूने सदर कार्यशाळा महत्वाची ठरली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मास्वे संस्थेचे अध्यक्ष डॉ. अंबादास मोहिते, प्रमुख वक्ते म्हणून डॉ. जयश्री गुडघे, प्रमुख अतिथी म्हणून महात्मा फुले महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. गजानन रत्नपारखी, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सिमा अढाऊ उपस्थित होते.
प्रथम सत्रात विभागात घेण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले . या स्पर्धेत प्रथम क्रमांक अनुराधा इंगोले, द्वितीय क्रमांक गौरी बुरंगे आणि वैष्णवी डहाके यांना, तर तृतीय क्रमांक मधुरा गोडे, प्रणाली घुले आणि श्वेता कपनीचोर यांना प्राप्त झाला. उत्तेजनार्थ पारितोषिक विनीत तायडे, शिवराज कावडकर, तनिषा खखार, फाल्गुनी भरडे, गायत्री इंगळे, मयुरी आठवले यांना प्राप्त झाले. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकाबद्दल कु. प्रिया वानखडे हिचा, तर तृतीय स्थान प्राप्त केल्याबद्दल कु. श्रद्धा जयस्वाल हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मानसशास्त्र विभागाच्या प्रा. वनिता राऊत यांनी प्रास्ताविक भाषणातून कार्यशाळेचे महत्व विषद केले. यावेळी मान्यवरांनी मनोगतातून विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन गौरी बुरंगे हिने, तर आभार प्रदर्शन अनुराधा इंगोले हिने केले.