अकोल्यात थरार! किरकोळ वादातून करण शितळेचा खून, 8 आरोपींवर गुन्हा दाखल | CCTV फुटेज Out |

अकोला :- अकोल्यातील जेतवन नगरमध्ये किरकोळ वादातून झालेल्या भयंकर घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. एका ऑटोच्या किरकोळ धडकेवरून झालेल्या भांडणाचा शेवट थेट खूनाने झाला. करण शितळे या युवकावर चाकूने हल्ला करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. त्याचे दोन साथीदार गंभीर जखमी असून, या प्रकरणात खदान पोलिसांनी आठ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. चला, पाहूया ही धक्कादायक घटना सविस्तर.
अकोल्यातील जेतवन नगरमध्ये सोमवारी रात्री थरारक घटना घडली. किरकोळ वादाचं रूपांतर रक्तपातात झालं. ऑटोच्या किरकोळ धडकेवरून सुरू झालेलं भांडण इतकं वाढलं की चाकू हल्ल्यात २४ वर्षीय करण शितळेचा मृत्यू झाला.
करण शितळे आपल्या दोन मित्रांसह रस्त्यावरून जात असताना ऑटोला हलकी धडक बसली. यावरून सुरू झालेल्या वादानं रौद्ररूप धारण केलं. आरोपींनी तात्काळ करण आणि त्याच्या मित्रांवर चाकूने सपासप वार केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद झाली असून, यामध्ये आरोपींचा निर्दयीपणा स्पष्टपणे दिसून येतो. खदान पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सात आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या आरोपींपैकी चार अल्पवयीन असल्याचं उघड झालं आहे. अजूनही एक आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणात ८ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी सात जणांना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी शहरातील नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
किरकोळ वादातून घडलेली ही रक्तरंजित घटना खरंच धक्कादायक आहे.अशा घटना टाळण्यासाठी सामंजस्य, संयम आणि कायद्याचा आधार घेणं गरजेचं आहे. पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा City News.