अजित पवारांचा नांदेड दौरा: काँग्रेस नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश | मोठ्या घडामोडी

नांदेड :- आजच्या प्रमुख बातमीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा गाजतो आहे. काँग्रेसचे माजी खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि डॉ. मीनल खदगावकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होत आहे. त्यासोबतच अजित पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
पाहूया सविस्तर :
नांदेड विमानतळावर पोहोचताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यात कर हटवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि पीयूष गोयल यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. 20% निर्यात कर हटवल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.
पक्षप्रवेश कार्यक्रम :
नांदेडमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा दिवस ठरला आहे. काँग्रेसचे माजी खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि त्यांच्या सुनबाई डॉ. मीनल खदगावकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
महायुतीतील सर्व नेते आपापल्या पद्धतीने पक्षवाढीसाठी काम करत आहेत. आमचा पक्षदेखील मजबूत होईल यासाठी हा पक्षप्रवेश महत्त्वाचा आहे.
कोरटकर प्रकरण :
याशिवाय अजित पवार यांनी कोरटकर प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की पोलीस स्वतंत्रपणे काम करत आहेत आणि न्यायालयीन निर्णयानुसारच पुढील कारवाई होईल.
पोलिसांनी कोणत्याही पक्षाच्या किंवा गटाच्या दबावाखाली न येता संविधानानुसार काम करावं.
लाडकी बहिण योजना :
अजित पवारांनी लाडकी बहिण योजनेवरील निधी अभावाच्या आरोपांनाही सडेतोड उत्तर दिलं. मी अर्थमंत्री असताना प्रत्येक गोष्ट कॅबिनेटमध्ये सविस्तरपणे मांडली जायची. योजनेला निधी देण्यात कुठलीही अडचण नाही.
तर अशाप्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. पक्षप्रवेश, कांदा निर्यात कर हटवण्याचा निर्णय आणि विविध विषयांवरील प्रतिक्रिया या दौऱ्याला महत्त्वाचे परिमाण देतात. पाहत राहा City News !