अमरावती महानगरपालिका, अमरावती जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शहरात महानगरपालिकेकडून जनजागृती रॅली
अमरावती :- दरवर्षी २४ मार्च “जागतिक क्षयरोग दिन” म्हणून साजरा केला जातो. मा.आयुक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई ह्यांचे दि.१२ मार्च,२०२५ चे ई-मेल पत्रान्वये अमरावती महानगरपालिकेत आज जागतिक क्षयरोग दिनाचे निमित्ताने क्षयरोग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीच्या जागतिक क्षयरोग दिनाची थीम “होय आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतो प्रतिज्ञा करा, तरतूद करा, सेवा द्या” यावर केंद्रीत असणार आहे. हा संदेश संपूर्ण अमरावती महानगरपालिकेत पाठविण्यासाठी आज सकाळी ७.०० वाजता नेहरु मैदान येथून क्षयरोग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीला अमरावती महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ.फिरोज खान, वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप पाटबागे ह्यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात झाली. ह्या रॅलीत सार्वजनिक आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, नर्सिंग कॉलेज यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. रॅलीची सुरुवात नेहरु मैदान येथून होवून रॅली राजकमल चौक, जयस्तंभ चौक मार्गे परत नेहरु मैदान येथे येवून रॅलीचे समापन करण्यात आले. रॅलीत ८०० ते १००० जणांनी सहभाग नोंदविला.
रॅलीदरम्यान सहभागींनी टीबी जागरूकता घोषणा दिल्या आणि पत्रके वाटली.महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या संकल्पनेतून शहरात क्षयरोग मुक्त भारत अभियान राबवण्यात आले. या निमित्ताने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने ७ डिसेंबर,२०२४ ते २४ मार्च,२०२५ या कालावधीत विविध ठिकाणी शिबिरे घेण्यात आली. क्षयरोग मुक्त अमरावती साठी लक्षणे असलेले रुग्ण वेळीच शोधून त्यांच्यावर उपचार करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी हे जनजागृती अभियान राबविण्यात आले आहे असे आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांनी सांगितले.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. यात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह आशा सेविकांनी सहभाग घेतला. आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. नेहरु मैदान येथून होवून रॅली राजकमल चौक, जयस्तंभ चौक मार्गे ही रॅली काढण्यात आली. यातून क्षयरोगाच्या लक्षणांबाबत जनजागृती करण्यात आली.
क्षयरोगाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती आवश्यक आहे. त्यातून वेळीच रुग्ण शोधून त्यांच्यावर योग्य उपचार करता येतात. या उपक्रमात आरोग्य विभागाने चांगली मेहनत घेऊन काम केले आहे. नागरिकांनीही लक्षणे आढळल्यास तत्काळ महानगरपालिकेच्या क्षयरोग विभागात संपर्क साधून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांनी केले आहे.