ओव्हरलोड राख वाहतुकीचा थरार! अमरावतीत नागरिक त्रस्त, प्रशासनाचा डोळसठठा

अमरावती :- अमरावतीच्या वलगाव-दर्यापूर मार्गावर ओव्हरलोड राख वाहतुकीचा थरार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नागरिकांच्या तक्रारी आणि सततच्या आंदोलनानंतरही प्रशासनाने डोळेझाक केली आहे. या वाहतुकीमुळे परिसरात धुळीचे लोट आणि प्रदूषणाने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे आजार जडत आहेत. चला, पाहूया संपूर्ण अहवाल.
ओव्हरलोड राख वाहतुकीचा हैदोस! अमरावती वलगाव-दर्यापूर मार्गावर नागरिकांच्या जीवाशी खेळ :
अमरावती जिल्ह्यातील वलगाव-दर्यापूर मार्गावर ओव्हरलोड राख वाहतुकीचा कहर सुरू आहे. मोठमोठे डंपर आणि ट्रक भरून ही राख गावांमधून सर्रास ने-आण केली जात आहे. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे उडणाऱ्या राखेच्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या, आंदोलनेही केली, पण आरटीओ आणि पोलिस विभागाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. धुळीचा गुबार उडत असल्याने नागरिकांना श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहेत. लहान मुले, वृद्ध आणि दमा तसेच श्वसनविकार असलेल्या नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे.
स्थानिक रहिवाशांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. राखेच्या धुरामुळे घरातही बसवत नाही. लहान मुलांना सतत खोकला होतोय. प्रशासन कधी जागं होणार?या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल. हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
जगभर प्रदूषणावर चर्चा सुरू असताना, अमरावतीच्या रस्त्यांवर मात्र नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. ओव्हरलोड राख वाहतुकीवर प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा City News.