कुणाल कामराच्या टीकेवर सरकारचा संताप | विधानसभेत कठोर कारवाईची चेतावणी

कॉमेडियन कुणाल कामराच्या टीकात्मक कवितेवर राज्याच्या राजकारणात उसळलेलं वादळ! आज विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली.काय आहे हा वाद, आणि यावर सरकारने कोणती भूमिका घेतली आहे?
पाहूया सविस्तर बातमी :
कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकात्मक कवितेवरून राजकीय वातावरण तापलं आहे. विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये यावर सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की, प्रसिद्धीसाठी जर कोणी सुपाऱ्या देऊन अपमान करत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई होईल.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही कामराच्या टीकेवर नाराजी व्यक्त करत म्हटलं,राजकीय स्वार्थासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणीही चुकीची वक्तव्य करू नये. राज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारकडून या प्रकरणाची सखोल चौकशी होईल, असं सांगितलं. पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी तर थेट.
कुणाल कामराने जाहीर माफी मागावी.”अशी मागणी केली. याआधीही कुणाल कामरा यांनी अनेकदा राजकीय नेत्यांवर टीका केली आहे. मात्र, यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत, “समाजात अशांतता पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. असा इशाराही दिला आहे. आता या प्रकरणावर कुणाल कामराची प्रतिक्रिया काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राजकीय टीका आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यामधली सीमारेषा कुठे आहे? यावर विविध मतप्रवाह समोर येत आहेत. सरकारने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे आता पुढील घटनाक्रम काय असेल,याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सिटी न्यूजसोबत जोडा, आम्ही तुमच्यासाठी आहोत.