कुणाल कामराच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसैनिक आक्रमक – अकोल्यात जोरदार विरोध प्रदर्शन

अकोला :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विनोदानंतर कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबईतील हॉटेलची तोडफोड आणि आंदोलनं यामुळे हा वाद आता आणखी चिघळला आहे.अकोल्यात शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या प्रतिमेला जोडे मारत ‘जोडेमारो आंदोलन’ केलं
प्रकरणाचा वेध घेऊया सविस्तर रिपोर्टमध्ये :
विनोदी कलाकार कुणाल कामरा यांनी केलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. मुंबईतील एका हॉटेलची तोडफोड करण्यात आली असून आयोजकांनी शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.शिवसैनिक संतप्त झाले असून त्यांनी कोल्यातील मदनलाल धिंग्रा चौकात निदर्शने केली.
‘जोडेमारो आंदोलन’ करत कुणाल कामराच्या फोटोला जोडे मारण्यात आले आणि त्याच्या प्रतिमेची जाहीर होळी करण्यात आली.शिवसेनेच्या नेत्यांनी या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, “महाराष्ट्राच्या नेत्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही.”असं स्पष्ट केलं आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुठल्याही नेत्याचा अपमान करणं योग्य नसल्याचंही शिवसेनेकडून सांगण्यात आलं. दुसरीकडे, कुणाल कामराने यावर कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिली नाही. आता या संपूर्ण प्रकरणावर सरकार आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागलं आहे.
विनोद आणि अपमान यामधील सीमारेषा ओलांडली गेली का? हे आता चर्चेचा विषय ठरलं आहे. शिवसैनिकांचा संताप, आयोजकांचा शो रद्द करण्याचा निर्णय आणि सरकारची भूमिका यामुळे पुढील काही दिवस हा वाद शांत होण्याची चिन्हं नाहीत. City News वर पाहत राहा नवनवीन अपडेट्स.