नवनिर्वाचित आ.संजय खोडके यांनी इर्विन चौक स्थित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला केले अभिवादन.
अमरावती :- अमरावती शहरातील इर्विन चौक स्थित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा हा लोक चळवळ व सामाजिक आंदोलनाचे प्रतीक व केंद्रस्थान आहे. तमाम जनतेचे श्रद्धास्थान व प्रेरणास्थान आहे. त्या ठिकाणी अनुयायांची गर्दी होत असल्याने चांगल्या सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. या संदर्भातील प्रारूप तयार करण्यात आले असून आगामी काळात शहराच्या लौकिकाला साजेसे व आंबेडकरी जनतेला अपेक्षित व अनुरूप स्मारक बांधण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचा विश्वास नवनिर्वाचित आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केला.महाराष्ट्र विधानपरिषदेवर निर्वाचित झाल्यानंतर प्रथमच अमरावती आगमना दरम्यान आ. संजय खोडके यांनी इर्विन चौक स्थित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले.
आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे. भारतीय राज्यघटनेचे महान शिल्पकार होऊन त्यांनी सर्व भारतीयांना समतेचे अधिकार बहाल करून दिले. त्यामुळे समताधिष्ठीत समाज निर्माण करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मोलाचे असून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासह विकासाचा समतोल राखण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे देखील आ. संजय खोडके म्हणाले. दरम्यान यावेळी उपस्थित आंबेडकरी संघटना व अनुयायांच्या वतीने आ.संजय खोडके यांचा महाराष्ट्र विधान परिषदेवर नवनिर्वाचित झाल्या बद्दल सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
यावेळी आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, माजी मनपा सभापती भूषण बनसोड, माजी नगरसेवक मंगेश मनोहरे , प्रवीण मेश्राम ,रतन डेंडूले पहेलवान, रत्नदीप बागडे, खोरिपा चे जेष्ठ नेते उत्तमराव गवई, बुद्ध जयंती उत्सव समितीचे मुख्य संयोजक सुनील रामटेके, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रविकांत गवई, सांची फाऊंडेशन चे प्रा.जगदीश गोवर्धन, भिमटेकडी संवर्धन समितीचे प्रवीण आकोडे, माता रमाई पुतळा समितीचे अध्यक्ष संजय भोवते ,सचिव राहुल तायडे, संजय महाजन, विनोद भालेराव,किशोर गोसावी, निलेश जामनिक, प्रथमेश गवई, समाजभूषण भूषण वासुदेवराव वानखडे , दलित पँथरचे महेश तायडे, रिपाई नेते ओमप्रकाश बनसोड ,राजाभाऊ धवणे, सुनील मेश्राम ,वेदांत तंतरपाळे, व्ही.एम.वानखडे आदींसह आंबेडकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.