नवसारी जवाहर नवोदय विद्यालयाच्या जंगलाला भीषण आग – अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
अमरावती :- नवसारीच्या जवाहर नवोदय विद्यालय परिसरातील जंगलात आज दुपारी लागलेल्या भीषण आगीने परिसरात खळबळ उडवली आहे.आगीचे लालसर लोळ आणि धुराचे लोट दूरवरूनही स्पष्ट दिसत आहेत. सध्या अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल असून, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिसरात असलेल्या जंगलाला अचानक आग लागली.कोरडे गवत आणि प्रचंड उष्णतेमुळे आगीने काही वेळातच भीषण रूप घेतले. आगीमुळे परिसरात घनदाट धूर पसरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत.अद्याप आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.मात्र कोरड्या हवामानामुळे आणि गवताळ जंगलामुळे आग झपाट्याने पसरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.प्रशासनाने परिसरातील नागरिकांना घटनास्थळी जाऊ नये असा इशारा दिला आहे.
सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मात्र पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अग्निशमन दलाकडून आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.या घटनेवर आम्ही सतत नजर ठेवून राहू आणि तुम्हाला अपडेट्स देत राहू.
सध्या नवसारीतील जवाहर नवोदय विद्यालय परिसरातील जंगलात भीषण आग भडकलेली आहे.अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही, मात्र नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असा प्रशासनाचा इशारा आहे.City News वर आम्ही तुम्हाला या घटनेचे सर्व अपडेट्स देत राहू. पाहत राहा City News.