नागपूर: ८० वर्षीय वृद्धावर घरफोडी, हुडकेश्वर पोलिसांची ४८ तासांत जलद कारवाई | आरोपीला अटक

नागपूर :- नागपुरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. ८० वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीच्या घरात चोरी करून १.८५ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, हुडकेश्वर पोलिसांच्या वेगवान तपासामुळे अवघ्या ४८ तासांत गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले.
पोलिसांनी १००% मुद्देमाल हस्तगत करत आरोपीला गजाआड केले आहे.
पाहुया या घटनेचा सविस्तर अहवाल :
नागपूरच्या जवाहर नगर भागात ८० वर्षीय महेंद्र वर्मा यांच्यावर घरफोडीचा धक्कादायक प्रकार घडला.सकाळच्या वेळी केअरटेकरच्या गैरहजेरीत आरोपीने त्यांच्यावर हल्ला करत गळ्यातील २५ ग्रॅम सोन्याचा गोप, ५ ग्रॅमचे लॉकेट आणि ५,००० रुपयांची रोकड हिसकावून नेली.हुडकेश्वर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि ७० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले.
संशयित ओमप्रकाश निकोरे याचा शोध घेत त्याला प्रशांत बार, मानेवाडा रोडवरून अटक करण्यात आली.आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या प्रकरणाचा आणखी सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमप्रकाश भलावी करीत आहेत.पोलीस उप आयुक्त रश्मीता राव आणि सहायक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण झाली.४८ तासांत चोरी उघडकीस आणणे हे नागपूर पोलिसांचे प्रभावी कार्यप्रदर्शन आहे. यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणत अवघ्या ४८ तासांत १००% मुद्देमाल परत मिळवून दिला.या कामगिरीबद्दल संपूर्ण पोलिस दलाचे अभिनंदन केले जात आहे.अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज.