पाचपावलीत गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उघड | पोलिसांची धडक कारवाई

नागपूर :- नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.गोवंशीय जनावरांची निर्दय वाहतूक करून कत्तलीसाठी नेण्यात येत असताना पोलिसांनी वेळीच कारवाई केली आहे. आरोपी फरार झाला असला तरी पोलिसांनी त्वरित वाहन ताब्यात घेतले आणि गोवंशीय जनावरांची सुटका केली.
नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई केली.२३ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना हा प्रकार उघडकीस आला.लष्करीबाग, मोतीबाग रेल्वे क्रॉसिंगजवळ एक अशोक ले-लॅंड कंपनीचा मालवाहू ट्रक (क्र. MH 27 BX 8506) आढळून आला.पोलीस पाहून ट्रक चालक पळून गेला.
वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता ३ गोवंशीय जनावरे निर्दयतेने बांधून कोंबून ठेवलेली आढळली.यानंतर जनावरांची सुटका करून गौशाळेत हलवण्यात आले.या कारवाईत सुमारे ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैंद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ आणि प्राणी क्रूरता अधिनियम १९६० अंतर्गत कलम ५, ५(अ), ५(ब), ९ व ११(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक आणि कत्तलीसाठीचा प्रयत्न हा कायद्याने गुन्हा आहे.पाचपावली पोलिसांनी केलेली तत्पर कारवाई ही प्रशंसनीय आहे. City News वर आम्ही तुम्हाला असेच अपडेट्स आणि ब्रेकिंग न्यूज देत राहू. पाहत राहा City News!