Accident NewsAmravatiLatest News
ब्रेकिंग न्यूज: नवसारी जवळ नवोदय शाळेच्या परिसरात भीषण आग

अमरावती :- नवसारी नवोदय शाळेजवळील परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीने परिसरातील वृक्ष आणि गवताला वेढले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू असून मोठ्या प्रमाणावर धूर आकाशात पसरला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे. अधिक माहितीसाठी पाहत राहा City News.