महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्नची मागणी | महाराष्ट्र विधानसभेची ऐतिहासिक शिफारस

सामाजिक न्याय आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करावे अशी शिफारस महाराष्ट्र विधानसभेने केली आहे.सर्वपक्षीय सहमतीने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक परिवर्तनाच्या या प्रतीकात्मक निर्णयावर सिटी न्यूजच्या खास रिपोर्टमध्ये पाहूया सविस्तर माहिती.
महाराष्ट्र विधानसभेने महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे.सर्वपक्षीय सहमतीने मंजूर झालेल्या या प्रस्तावाला राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठा पाठिंबा मिळत आहे.महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण, स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक सुधारणांसाठी अभूतपूर्व कार्य केले.त्यांचे कार्य देशभरातील सामाजिक चळवळींना प्रेरणा देणारे ठरले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या शिफारशीवर समर्थन दर्शवत केंद्र सरकारने लवकरात लवकर भारतरत्न जाहीर करावा अशी मागणी केली आहे.सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांमध्ये या निर्णयाबाबत आनंदाचे वातावरण आहे.या शिफारशीमुळे समाजसुधारणेच्या चळवळीला नवा सन्मान मिळाला आहे. आता केंद्र सरकारचा निर्णय काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा देशभरात आदराने उल्लेख केला जातो.त्यांना भारताच्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्याची मागणी ही सामाजिक न्यायाची मोठी पावती आहे.केंद्र सरकारचा पुढील निर्णय काय असेल, यावर सिटी न्यूज तुमच्यासोबत राहील.पाहत राहा – सिटी न्यूज!