महाराष्ट्र टीबीच्या विळख्यात! १०० दिवसांत ४० हजार रुग्ण | गंभीर परिस्थिती

महाराष्ट्रात टीबीच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. राज्यात अवघ्या १०० दिवसांत ४० हजाराहून अधिक टीबी रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.
अहवालावर सविस्तर पाहूया :
महाराष्ट्रात टीबीचा संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे. राज्यात १०० दिवसांच्या आत ४० हजार ४७१ टीबी रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाने १.३७ कोटी नागरिकांची तपासणी केली. यातून टीबीची गंभीर परिस्थिती उघड झाली आहे. २०२५ मध्ये केवळ दोन महिन्यांतच ३९,७०५ रुग्ण सापडले आहेत. गेल्या वर्षभराच्या तुलनेत ही मोठी वाढ आहे.
२०२४ मध्ये २.३० लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. भारतातील एकूण टीबी रुग्णांपैकी २५% रुग्ण भारतात आहेत. महाराष्ट्रात त्यातील १०% रुग्ण आहेत. राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये टीबी रुग्णशोध मोहीम राबवण्यात आली, जिथे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले. टीबी तज्ञ आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. तसेच लवकर निदान आणि उपचार हे यामध्ये महत्त्वाचे आहेत.
टीबी हा संसर्गजन्य आजार असून तो वेळीच ओळखून उपचार केल्यास बरा होतो. जर तुम्हाला सतत खोकला, वजन घटणे किंवा थकवा जाणवत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. आजसाठी इतकंच, आम्ही लवकरच परतू नवीन अपडेट्ससह.पाहात रहा सिटी न्यूज .