मेळघाटातील आदिवासींसाठी खासदार बळवंत वानखडे यांचा महत्त्वाचा उपक्रम!

मेळघाट :- आज आपण बोलणार आहोत अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासींसाठी खासदार बळवंत वानखडे यांनी उचललेल्या महत्त्वपूर्ण पावलावर. उन्हाळ्यात मोकळ्या वातावरणात झोपणाऱ्या आदिवासी बांधवांना मच्छरांपासून संरक्षण मिळावे यासाठी खासदार वानखडे यांनी कीटकनाशक जाळ्यांचे वाटप केले. यामुळे मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांपासून संरक्षण मिळेल.
पाहुयात हा संपूर्ण रिपोर्ट :
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा आदिवासीबहुल भाग आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत आदिवासी बांधव घराबाहेर झोपण्यास प्राधान्य देतात, मात्र मच्छरांचा मोठा त्रास होत असल्याने अनेक लोक आजारी पडतात. ही बाब लक्षात घेऊन अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी पुढाकार घेत कीटकजन्य आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी मेळघाटातील आदिवासी गावांमध्ये कीटकनाशक जाळ्यांचे मोफत वितरण केले.
चिखलदरा तालुक्यातील बोराळा गावासह अनेक ठिकाणी जाऊन खासदार वानखडे यांनी आदिवासी महिलांना जाळ्यांचे वाटप केले. यावेळी स्थानिक आदिवासी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी आदिवासी महिलांसोबत संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असेही आश्वासन त्यांनी दिले.
बळवंत वानखडे, खासदार अमरावती – बाईट
मेळघाटातील आमच्या आदिवासी बांधवांना आरोग्याची मोठी समस्या भेडसावत असते. मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांवर प्रतिबंध करणे गरजेचे आहे, म्हणूनच या कीटकनाशक जाळ्यांचे वाटप करण्यात आले. भविष्यातही आम्ही त्यांच्यासाठी अधिक मदत करू.
तर पाहिलंत ना, मेळघाटातील आदिवासींसाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. खासदार बळवंत वानखडे यांच्या या पुढाकारामुळे आदिवासी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अशीच महत्त्वाची आणि विश्वासार्ह बातमी पाहण्यासाठी City News सोबत राहा.