विद्यापीठात शहीद दिनानिमित्त ‘शहीद ए आझम भगतसिंग : एक क्रांतिकारी झंजावात’ विषयावर 25 मार्च रोजी व्याख्यानाचे आयोजन

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाद्वारे दि. 25 मार्च, 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्र सभागृहात शहीद दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भैय्यासाहेब मेटकर व डॉ. विद्या शर्मा उपस्थित राहतील. याप्रसंगी व्याख्याते म्हणून संत साहित्य व इतिहासाचे अभ्यासक डॉ. राजेश मिरगे हे ‘शहीद ए आझम भगतसिंग : एक क्रांतिकारी झंजावात’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान देतील. कार्यक्रमाला विद्यापीठ अधिसभा सदस्य श्री गिरीश शेरेकर, डॉ. प्रशांत विघे, श्री नितीन टाले व प्रा. कैलास चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
तरी आयोजित व्याख्यानास जास्तीजास्त संख्यने संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर व राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. निलेश कडू यांनी विद्यापीठाच्यावतीने केले आहे.