EXIM बँकेत नोकरीची सुवर्णसंधी | सरकारी बँकेत मॅनेजर होण्याची संधी | अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि पगार

सरकारी बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. EXIM Bank Recruitment 2025 अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी, डेप्युटी मॅनेजर आणि चीफ मॅनेजरसह विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घेऊया :
रिक्त पदांची माहिती :
मॅनेजमेंट ट्रेनी – डिजिटल टेक्नोलॉजी: 10 पदं
मॅनेजमेंट ट्रेनी – रिसर्च आणि अॅनालिसिस: 5 पदं
मॅनेजमेंट ट्रेनी – राजभाषा: 2 पदं
लीगल मॅनेजमेंट ट्रेनी: 5 पदं
डेप्युटी मॅनेजर (लीगल): 4 पदं
डेप्युटी मॅनेजर (ज्युनियर मॅनेजमेंट): 1 पद
चीफ मॅनेजर: 1 पद
अर्ज करण्याची सुरुवात : 22 मार्च 2025 शेवटची तारीख : 15 एप्रिल 2025
अर्ज प्रक्रिया कशी कराल?
eximbankindia.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: Career सेक्शन वर क्लिक करा. EXIM Bank Recruitment 2025 लिंकवर क्लिक करा. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. New Registration करा आणि आवश्यक माहिती भरा. लागणारी कागदपत्रे अपलोड करा. शुल्क भरून अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
पगार आणि सुविधा
EXIM बँकेत निवड झाल्यास उमेदवारांना आकर्षक पगार आणि शासकीय सुविधा दिल्या जातील. मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी ₹55,000 ते ₹60,000 पर्यंत पगार मिळू शकतो, तर उच्च पदांसाठी पगार त्याहून अधिक असतो.
सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी City News सोबत राहा.