LIVE STREAM

Accident NewsAmaravti GraminLatest News

अमरावतीच्या दर्यापूरमध्ये कापसाने भरलेल्या ट्रकला भीषण आग | ट्रकसह कापूस जळून खाक

अमरावती, दर्यापूर :- अमरावतीच्या दर्यापूर- अकोला मार्गावर सोमानी जिनिंगजवळ कापसाने भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्याचा कष्टाचा कापूस काही क्षणांतच जळून खाक झाला. अग्निशमन दलाच्या तात्काळ हस्तक्षेपानंतर आग आटोक्यात आली असली, तरी या आगीत मोठ्या आर्थिक नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

पाहुया सविस्तर रिपोर्ट भीषण दुर्घटना :

दर्यापूर- अकोला मार्गावरील सोमानी जिनिंगजवळ कापसाने भरलेल्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. या आगीत ट्रकसह शेतकऱ्याचा कापूस पूर्णतः जळून खाक झाला.

या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किट किंवा घर्षणामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. दर्यापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर कापूस जळून खाक झाला होता.

आगीमुळे काही वेळ दर्यापूर- अकोला मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना केला. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कापूस उत्पादकांसाठी ही घटना अत्यंत दुर्दैवी ठरली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आगीचे लोट इतके भयानक होते की काही मिनिटांतच ट्रकने पेट घेतला. धूराच्या लोटांमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असून आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. ट्रक चालकाचीही चौकशी केली जात आहे. या आगीत शेतकऱ्यांनी आपला कापूस गमावला असून सरकारकडून मदतीची मागणी केली जात आहे. नुकसान भरपाईसाठी शेतकरी प्रशासनाकडे अर्ज करणार असल्याचे समजते.

दर्यापूर नगरपालिकेने वेळेत धाव घेत आग आटोक्यात आणली, याबाबत प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी कापूस वाहतुकीदरम्यान सुरक्षिततेचे नियम पाळावेत, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे.

दर्यापूर येथील या आगीच्या घटनेने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या मदतीची प्रतीक्षा असताना, आग कशी लागली याचा शोध सुरू आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!