अमरावती विमानतळाचे नामकरण संत गाडगे महाराज विमानतळ करण्याची मागणी
अमरावती :- प्रतिनिधी नितेश किल्लेदार :- अमरावती विमानतळाला संत गाडगे महाराज विमानतळ असे नाव देण्याची मागणी नॅशनल धोबी महासंघ आणि श्री बुंदेला धोबी समाजाने केली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. पाहुया या मागणीचा संपूर्ण अहवाल.
अमरावती विमानतळाला संत गाडगे महाराज विमानतळ नाव देण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.नॅशनल धोबी महासंघ आणि श्री बुंदेला धोबी समाजाने या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.प्रवीण धुराटकर यांच्या नेतृत्वाखाली संघटक सचिव, पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत गाडगे महाराज यांचे समाजप्रती अमूल्य योगदान लक्षात घेऊन, त्यांचे नाव विमानतळाला देण्याचा आग्रह करण्यात आला आहे.स्वच्छता, समाजसेवा आणि शिक्षण या क्षेत्रात संत गाडगे महाराजांनी केलेले कार्य अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे.धोबी समाजासह विविध सामाजिक संघटनांनी देखील या मागणीला पाठिंबा दिला आहे.
या मागणीवर राज्य सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.अमरावतीकरांनीही या मागणीला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला आहे.संत गाडगे महाराज यांच्या कार्याचा उचित सन्मान म्हणून हे नामकरण व्हावे, अशी आग्रही भूमिका यावेळी मांडण्यात आली.मात्र, सरकारने जर यावर दखल घेतली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा देखील नॅशनल धोबी महासंघाने दिला आहे.
संत गाडगे महाराज यांचे नाव अमरावती विमानतळाला देण्याची ही मागणी आता सरकारपर्यंत पोहोचली आहे. या मागणीवर सरकार काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज.