उत्तर प्रदेश: पत्नीने 15 दिवसांत पतीची हत्या केली; प्रियकरासोबत मिळून रचला कट

उत्तर प्रदेश :- उत्तर प्रदेशच्या औरेया जिल्ह्यात लग्नाच्या 15 दिवसांतच नवरदेवाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरदेवाची हत्या इतर कोणी नाही तर त्याच्या नववधुने केली होती. नववधु प्रगतीने तिचा प्रियकर अनुरागसह पतीचीच हत्या केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
5 मार्च 2025 रोजी प्रगतीचे लग्न व्यावसायिक दिलीपसोबत लग्न झालं होतं. मात्र प्रगतीचे दुसऱ्याच कोणासोबत अफेअर होते. प्रगतीचा अनुराग नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. प्रगतीला कोणत्याही परिस्थितीत अनुरागसोबत लग्न करायचे होते. तर अनुरागदेखील प्रगतीसाठी कोणीतीही हद्द पार करण्यात तयार होता. अशातच प्रगतीने पतीची हत्या करण्याचा कट रचला.
मैनपुरी येथीर रहिवाशी दिलीपचे लग्न औरेया येथे राहणाऱ्या प्रगतीसोबत झाले होते. लग्नानंतर 15 दिवसांनंतर म्हणजेच 19 मार्च रोजी दिलीपवर गोळी झाडली. उपचारादरम्यान दिलीपचा मृत्यू झाला. तपासादरम्यानच पोलिसांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. पोलिसांनी या हत्याकांडात त्याच्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराने हा कट चरला होता.
19 मार्च रोजी औरेया जवळच्या एक युवक जखमी अवस्थेत सापडला. गेहूच्या शेतात तो गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. ग्रामस्थांनी लगेचच याची माहिती पोलिसांना कळवली. पोलिस घटनास्थळी पोहोचून त्यांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे त्यांची प्रकृती आणखी नाजूक झाल्याने त्यांना मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला.
पोलिस चौकशीत प्रगतीने पतीची हत्या केल्याचे कबुल केले आहे. तपासात समोर आले की, प्रगतीचा प्रियकरदेखील त्याच गावात राहत होता. लग्नानंतरदेखील ती त्याला सोडायला तयार नव्हती. यामुळंच तिने पतीची हत्या करण्याचा निर्णय घेतला आणि कट रचला. प्रगतीने अनुरागला पतीच्या हत्येसाठी दोन लाख रुपये दिले. त्यानंतर अनुरागने त्याचा साथीदार रामजी नागरसोबत मिळून 19 मार्च रोजी प्रगतीचा पती कन्नोजहून परतत येत असताना हॉटेलजवळ थांबून त्याच्यावर गोळ्या झाडल्या.
पोलिसांनी अनुराग आणि रामनी नागर यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे. त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी प्रगतीचे नाव घेतले तेव्हा तिला अटक करण्यात आली.