नांदेडमध्ये बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भव्य मोर्चा
नांदेड :- बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध भिकू आणि बौद्धांच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी नांदेडमध्ये भिकू महासंघ आणि बौद्ध बांधवांनी भव्य मोर्चा काढला. या मोर्चाला मोठ्या संख्येने बौद्ध बांधवांनी पाठिंबा दिलाय. या आंदोलनाचा पुढील टप्पा दिल्लीत जंतर-मंतरवर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय. पाहुया आमच्या प्रतिनिधीकडून या मोर्चाचा विशेष अहवाल.
नांदेडमध्ये बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी हजारोंच्या उपस्थितीत भव्य मोर्चा निघाला.कृषी उत्पन्न बाजार समितीपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.बौद्ध भिकू महासंघ आणि बौद्ध समाजाच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.”बुद्धांचा टेम्पल अॅक्ट 1949″ हा कायदा रद्द करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
महाबोधी महाविहार भिकू आणि बौद्धांच्या ताब्यात देण्याची मुख्य मागणी.सरकारने त्वरित निर्णय न घेतल्यास दिल्लीत जंतर-मंतरवर मोर्चा काढण्याचा इशारा.नांदेड शहरात कडक पोलीस बंदोबस्तात मोर्चा शांततेत पार पडला.या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असल्याचं चित्र.भिकू महासंघाच्या नेतृत्वाखालील या मोर्चामध्ये महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती.सरकारकडून निर्णयाची प्रतीक्षा असल्याचं भिकू महासंघाने स्पष्ट केलं आहे.
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी नांदेडमध्ये उमटलेला आवाज आता दिल्लीतही पोहोचणार आहे. या आंदोलनाला सरकार कसा प्रतिसाद देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिटी न्यूजसाठी मी आहे तुमच्यासोबत, पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज.