यवतमाळ दरोडा प्रकरण: पोलिसांची फिल्मी स्टाईल पाठलागात 6 आरोपींना अटक

यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे दरोड्याची थरारक घटना घडली आहे. किराणा व्यापारी गणेश काळबांडे यांच्या घरी दरोडा टाकून पळ काढणाऱ्या सात आरोपींपैकी सहा जणांना पोलिसांनी शेंबाळपिंपरी येथे फिल्मी स्टाईलने पकडले. आरोपींच्या मुसक्या आवळताना पोलिसांनी तब्बल पाच किमीचा थरारक पाठलाग केला.
पाहूया संपूर्ण रिपोर्ट :
दारव्हा येथील गणेश काळबांडे यांच्या घरी दुपारी १ वाजता दरोडा पडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. दरोडेखोरांनी शेंबाळपिंपरी येथे पोलीस दिसताच चारचाकी वाहन सोडून शेतशिवारात पळ काढला. मात्र खंडाळा पोलिसांनी पाच किलोमीटरपर्यंत थरारक पाठलाग करून सहा आरोपींना पकडले.पोलिसांचा हा पाठलाग अक्षरशः एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा होता. शेवटी पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले.सात आरोपींपैकी सहा आरोपींना अटक करण्यात यश आले असून सातवा आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे.
पोलिस तपासात समोर आले की, सर्व आरोपी हे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.आरोपींकडून एक बंदूक, चोरीचे घबाड आणि एक बॅग जप्त करण्यात आली आहे.खंडाळा पोलिस ठाण्याचे ठाणेदार देवदास पाटील, फौजदार देवानंद कायंदे, सुरेश राठोड, गोपाल पांडे, सुनिल हगवणे आणि गोविंद यांच्या धडाकेबाज कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.पुसद एसडीपीओ हर्षवर्धन बि. जे., दारव्हा एसडीपीओ रजनीकांत चिलुमुल्ला आणि एलसीबी प्रमुख सतीष चवरे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. या कारवाईबद्दल संपूर्ण पोलीस दलाचं अभिनंदन होत आहे.
पोलिसांनी अतिशय धाडसी पद्धतीने या दरोडेखोरांना पकडलं आणि नागरिकांचा विश्वास जिंकला. यातील सातवा आरोपी अद्याप फरार आहे, मात्र पोलीस लवकरच त्यालाही अटक करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. अशाच अपडेट्ससाठी पाहत राहा. सिटी न्यूज.