LIVE STREAM

AmravatiLatest News

शेवटचे पाच दिवस : ३१ मार्च पर्यंत मालमत्‍ता कर भरल्‍यास नागरिकांना मिळणार शास्‍तीत २५% सुट मालमत्‍ता कर न भरल्‍यास मालमत्‍तांवर होणार जप्‍ती

अमरावती :- महानगरपालिकेने मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना शेवटचे पाच दिवस म्‍हणजे ३१ मार्च पर्यंत शास्‍तीत २५% सुट दिली जाणार आहे. त्यानंतर कर न भरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मनपा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्‍प्‍यात संबंधित व्यावसायिकांच्या कार्यालयातील, कारखान्यातील सामान जप्त करण्यात येईल. तर दुस-या टप्प्यात त्या सामानाचा लिलाव करण्यात येईल. त्यामुळे करवसुलीसाठी महापालिकेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. करसंकलन विभागाकडून शहरातील मालमत्ताधारकांना विविध माध्यमातून कर भरण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, अनेक बड्या थकबाकीदारांनी, व्यावसायिक आस्थापनांनी, गृहनिर्माण क्षेत्रातील विकासकांनी मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर थकवला असून त्यांनी कराचा भरणा करावा, यासाठी महापालिका टॉप-१० थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करत आहे.

थकबाकीदारांकडून करवसुली झाल्यास मालमत्ता करवसुलीचे लक्ष गाठण्यात महापालिकेला मोठा हातभार लागेल. परंतु, तसे होताना दिसत नाही. नागरिकांना शास्‍तीत २५% सुट दिली जाणार असून कर भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च आहे. अशा थकबाकीदारांना बिलासोबतच जप्तीपूर्व नोटीस सुध्दा बजाविण्यात आल्या आहेत. मालमत्ताधारकांनी जागरुकपणे कर भरुन शास्‍तीच्‍या २५ टक्‍के सवलतींचा लाभ घ्‍यावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्‍त सचिन कलंत्रे यांनी केले आहे.

करसंकलन विभागाकडून थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांचे जप्ती अधिपत्र काढण्यात आले असून अशा मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यासाठी जप्ती मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्यासोबतच, फक्त चालू वर्षाचा मालमत्ता कर ३१ मार्च अखेर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता देखील थकबाकीदारांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात येणार असून सदर मालमत्तासुध्दा मालमत्ता जप्तीस पात्र होणार आहेत.

महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ताधारकांमध्ये नियमितपणे कर भऱणाऱ्या करदात्यांनी कायमच करसंकलनामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे. परंतू अद्यापही ज्या मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला नाही अशा मालमत्ताधारकांनी ३१ मार्च रोजीपर्यंत आपल्या कराचा भरणा करुन वाढणारे २ टक्क्यांचे विलंब शुल्क व मालमत्ता जप्तीची कारवाई टाळून शहराच्या विकासामध्ये हातभार लावावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्‍त सचिन कलंत्रे यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!